आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही आज बोलताना, शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे.
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं., असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आणखी एका भाजपच्या मंत्र्यांनं माध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी शब्दात उल्लेख केला.
रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा शिवरायांचा एकेरी उल्लेख केला.
हे ही वाचा : “ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”
मला असं वाटतं की, शिवाजीबद्दल असं वक्तव्य कोणी करू नये, परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं ते वक्तव्य आहे का तर याचा सगळ्या समाजाने विचार केला पाहिजे, असं रावसाहेब दानवे या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
भाजपचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा “शिवाजी” म्हणून एकेरी उल्लेख करून महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. pic.twitter.com/pqJsOAXJ6k
— Subhash N Goriwale (@GoriwaleSubhash) December 4, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
राज्यपालांनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांचं शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले…
“मनसेनं विजयी खातं उघडलं; जत ग्रामपंचायतीत मनसेच्या प्रियांका खिलारे यांची बिनविरोध निवड”
“राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; उद्यापासून राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार”