आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने आज ट्विटरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसत आहेत.
जडे़जाने, गुजरातच्या नागरिकांना बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत प्रचार करण्याचा प्रयत्न केला. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान
नरेंद्र मोदींच्या नावाने मते मिळत नाहीत याची खात्री झाल्यावरच जडेजा, या-त्या लोकांना बाळासाहेब यांचे नाव घ्यावे लागते. हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांची गुजरातमध्ये हार आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली.
मी तो व्हिडीओ बघितलाय. ज्या पद्धतीने तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय, त्याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्माने काहीच होत नाही. काही जरी झालं तरी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची गरज लागते. निवडणुका गुजरातच्या असोत किंवा महाराष्ट्राची असो, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे या नावाचीच लागते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…
“अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला?; ‘या’ दिवशी भाजप-शिंदे गटातील ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद”