Home महाराष्ट्र राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू...

राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेऊन…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरे गधड्या तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? सावरकर कोण होते ते माहिती तरी आहे का? त्यांना कुठे ठेवलं होतं ते काय करत होते? काय हालअपेष्ठा सहन केल्या?, असा  सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. मुंबईतील नेस्को सेंटर येथे मनसेचा आयोजित गटप्रमुखांच्या मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावरून आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा भरघोस, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचाच राज ठाकरेंवर झालेला परिणाम आणि प्रभाव त्यामुळे ते विचलित झाले आहेत, असा टोला भाई जगताप यांनी यावेळी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : अरे गधड्या, सावरकरांवर बोलायची तुझी लायकी तरी आहे का?; राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात

दरम्यान, मनसे हा संपलेला पक्ष आहे आणि राज ठाकरे यांच्या वेळोवेळी भूमिका बदलत असतात म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. राज ठाकरे यांनी इतरांच्या मेंदूविषयी बोलण्याआधी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांनीच आता आपला मेंदू भाजप आणि मिंधे सरकारकडे गहाण ठेवलेला आहे. म्हणून सुपारी घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे. हे आजच्या भाषणाने दिसून येत आहे, असा आरोपही भाई जगताप यांनी यावेळी केला. तसेच राज ठाकरे हे कलाकार आहेत म्हणून त्यांना राहुल गांधी यांच्या आवाजात आर डी बर्मनच दिसणार. नाही तरी ते सध्या सिनेमामध्ये आवाज देण्याचं कामच तर करत आहेत, असा टोलाही भाई जगताप यांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतोय, नाहीतर…; राज ठाकरेंचा, भगतसिंग कोश्यारींवर हल्लाबोल

ब्रेकींग न्यूज! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

आधी पद द्या, मगच प्रवेश करतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रस्ताव