नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने क्रिकेट सामने पूर्णपणे बंद आहे. क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी ICC कडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये क्रिकेट मालिका सुरु होण्याआधी १४ दिवस कोणत्याही क्रिकेट संघाला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. यावर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने मत व्यक्त केलं आहे.
वैयक्तिक खेळांमध्ये सोशल डिन्स्टन्सिंग हा प्रकार शक्य आहे, पण क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमध्ये शक्य नाही. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला विकेट किपरच्या बाजूला स्लीपचा फिल्डर हवा असेल, तर तुम्ही तो फिल्डर ठेवणार नाही का?. असा सवाल इरफान पठाण याने ICC ला केला.
दरम्यान, त्याचसोबत प्रत्येक संघातील खेळाडूंना 14 दिवसांचा क्वारंटाइन काळ असेल असा नियम आहे. त्यात कोणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला, तर त्याला क्रिकेटपासून दूर ठेवलं जाईल. पण क्वारंटाइननंतर केवळ तंदुरूस्त खेळाडूच मैदानात उतरणार आहेत. अशा वेळी जर मैदानावरही नियम ठेवण्यात येत असतील, तर क्वारंटाइन कालावधीचा काय उपयोग?” असा सवाल इरफान पठाणने पीटीआयशी बोलताना उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला
आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?
राज्य कसं चालवावं हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही- नारायण राणे
पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत-संजय राऊत