आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : किल्ले प्रतापगडच्या पायश्याशी असलेल्या अफजलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटेपासून सूरूवात झाली आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या कबरीच्या जवळ असलेल्या खोल्या आता जमीनदोस्त करण्यात येत आहे. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील 1800 हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात काल रात्रीपासून दाखल झाले आहेत. पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी 6 वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरूवात झाली.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
हे ही वाचा : स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत., असं संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं.
अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 10, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरे गटात इनकमिंग सूरूच; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”