“वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं काैतुक”

0
553

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचं काैतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृहात शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान बोलताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”

“भारताचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोना पाॅझिटिव्ह”

“राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”

तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरू नका; रोेहित पवारांचा भाजपला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here