आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढणार आहे. यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. याला आता ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…
ती मशाल नसून कोन आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं, असं रविंद्र वायकर म्हणाले आहेत.
दरम्यान,उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे, असे नितेश राणे म्हणाले होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
राजउद्धव ठाकरेंना भाजपाचा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश
ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण