Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे.  यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. तर शिंदे गटालाही नवे चिन्ह मिळाले आहे. मात्र अशातच आता उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारेयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : …तो पर्यंत उद्धव आणि शिवसैनिक तुझी मुलं, काळजी घे; खासदार संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.

दरम्यान, यामुळे धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष अनिता बिर्जे, निवेदक सचीन चव्हाण यांच्यासह सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, सर्व ठाकरेंनी, आता तरी एकत्र यायला हवं”

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, 20 मे रोजी, ठाकरेंनी शिंदेंना बोलावलं आणि…