आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. आज ठाकरे आणि शिंदेगटाच्या निवडणूक चिन्हासंदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. याआधी आजच्या सामना अग्रलेखातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.
हे ही वाचा : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, ठाकरेंची शिवसेना ही…
कितीही कट-कारस्थानं करा, बेइमानीचे घाव घाला, शिवसेना संपणार नाही!, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल , झेपावेल , उसळेल , दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल . निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘ धनुष्यबाण ‘ हे चिन्ह गोठवले आणि ‘ शिवसेना ‘ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला . दिल्लीने हे पाप केले . बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली ! आम्ही शेवटी इतकेच सांगतो , कितीही संकटे येऊ द्या , त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!, असं सामनात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…
येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश