आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेत मात्र जोरदार इनकमिंगचा धुमधडाका सूरूच आहे.
शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे मंत्रीपद गेले असले तरी शिवसेनेच्या ताकदीत वाढ होत आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब वरुडे, चांगदेव वरुडे, नामदेव वरुडे व इतरांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
राजकरणात फक्त आर्थिक फायदे पहायचे नसतात तर कार्यकर्तेही जपावे लागतात. माणसे का सोडून जातात, याचे मुरकुटे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही वरूडे बंधूंनी यावेळी मुरकुटे यांना दिला. माणसे सांभाळण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सुख दुखात सहभागी व्हावे लागते, अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात असं वरूडे बंधूंनी यावेळी म्हटलं. तसेच यापुढे आम्ही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असंही या समर्थकांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन; दसरा मेळाव्यात ठाकरेंचा निर्धार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, आम्ही गद्दारी नाही केली, तर…