आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध उत्पादक संघावर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची ही नियुक्ती रद्द केली आहे.
खासदार धैर्यशील माने आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चे काढल्यामुळे माझी नियुक्ती रद्द केली गेली, असा आरोप मुरलीधर जाधव यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : …म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण
आता आगामी निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना माजी खासदार करणार, असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांना थेट आव्हान दिलं असून शिवसैनिक हे पद गोकूळच्या संचालकापेक्षा मोठं असल्याचं म्हणत मुरलीधर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधलाय.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू आहे त्यातील एका शिवसैनिकाचा बळी गेला आहे. हातकणंगलेचे खासदार उद्धवजींच्या नेतृत्वात निवडून आले. मात्र, त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे तळागाळातील, गावागावातील शिवसैनिक पेटून उठला आहे. तुम्हाला माजी खासदार म्हणून नाव लावावं लागेल एवढंच सांगतो. जिल्ह्यातीत तमाम शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे, असं मुरलीधर जाधव म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार कोसळेल; एकनाथ खडसेंचा दावा
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेचा शेवट जवळ आला आहे; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य