कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. दुसऱ्याला बोल लावण्याआधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं, असं म्हणत सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुरुवारी पलटवार केला.
गेली पाच वर्षे मंत्रिपदी राहिलेले चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायची सवय लागली आहे. कदाचित ते करोना काळातही एखादा इव्हेंट करून दाखवतील. त्यांना मंत्रिपदाच्या काळात कोल्हापूरच्या विकासासाठी काही करता आले नाही, असं सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान, आता मी पालकमंत्री असलो तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर असे तिघेही एकत्रित काम करीत असल्याने करोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला आहे. कोल्हापूरविषयी प्रेम वाटत होते तर २२ मार्चपासून ते कुठं होते?, असा सावलही सतेज पाटील यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ वक्तव्य
मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवीस
परप्रांतीयाच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध- शिवेंद्रराजे भोसले
‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर