आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला, अशातच आता उद्धव ठाकरेंच्या मदतीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांचे त्यावेळेचे कट्टर शिवसैनिक आणि दोनदा आमदार राहिलेले बाळासाहेब दांगट धावून आले आहेत.
हे ही वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित शहांचे आभार, म्हणाले…
बाळासाहेब दांगट यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. दांगट यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, याचवेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल येवले, खरेदी विक्री संघाचे संचालक चेतन बोजे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
…अन् ती एक गोष्ट केली की, शरद पवार पुन्हा सत्तेत येतात; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
शिवसेना का फुटली?, याचं उत्तर…; शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचं मोठं विधान