आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले असून आज प्रथमच उध्दव ठाकरे यांनी गटनेत्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. , असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य तुरुंगाचा रस्ता दाखवणारी आहेत, असं राणे म्हणाले.
“खोक्यांचा विषय तर आहेच. त्याची चौकशी होणार आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही. सुशांत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची (आदित्य ठाकरे) सुटका झालेली नाही. आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही,” असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
आज बोटं मोजताय, उद्या…; मनसेचा शरद पवारांवर पलटवार
शिंदे गटात गेलेल्या ‘या’ नेत्याची शिवसेनेने केली कोंडी, ‘या’ पदावरुन केली हकालपट्टी…