नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिदमे यांना शहराची महानगरप्रमुखाची सूत्रे हाती देत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला होता. मात्र शिवसेनेने तिदमे यांची कोंडी केलीय.
बंटी तिदमे हे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्ष पदी होते. त्यामुळे तिदमे शिवसेनेला शह देण्याच्या तयारीतच होते.मात्र म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संघटनेचे संस्थापक असलेल्या बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख असलेल्या सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे.
हे ही वाचा : “भाजपचा शिवसेना व शिंदे गटाला धक्का; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश”
तिदमे हे नवीन नाशिकमधील माजी नगरसेवक असल्याने त्याच विभागातील आणि शहरातील सेनेचे पहिल्या फळीतील नेते असलेले सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करत शिवसेनेने तिदमे यांची कोंडी केली आहे. शिवसेनेने खेळलेल्या या खेळीमुळे तिदमे यांची मोठी राजकीय अडचण झाली असून शिंदे गटात जाताच शिवसेनेने तिदमे यांना धक्का दिला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी