आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले असून आज प्रथमच उध्दव ठाकरे यांनी गटनेत्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. यावर उद्धव ठाकरेंनी, त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार ठाकरेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी
दरम्यान, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सागतोय, असं ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेची गत शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झालीये; मनसेची टीका
बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड