आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटना बळकटीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते नागपुरात दाखल झाले.
नागपूरमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलबाहेर सहा वर्षाचा चिमुकला आणि त्याची आजी सकाळपासून काही न खाता राज ठाकरेंच्या भेटीसाठी वाट बघत होते. यावेळी त्या चिमुकल्याने राज ठाकरेंना भेटल्याशिवाय काही खाणार नाही, असा हट्ट धरला आहे. चिमुकल्याचा बालहट्ट अखेर राज ठाकरेंनी पूर्ण केला.
हे ही वाचा : शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका
दरम्यान, मंगला पत्की आणि अद्वैत पत्की असे त्या आजी-नातवाचे नाव असून जेव्हा राज ठाकरे यांना कळले तेव्हा स्वतः त्यांनी आजी नातवाची भेट घेतली. यावेळी चिमुकल्याने राज ठाकरेंची सही घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदेंना कधीच भेटलो नाही; ‘या’ प्रमुख नेत्याचा खुलासा
“राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश?”