Home महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री, आमदार, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळ बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वांत मोठे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे हेदेखील दिसत असल्याने  सर्वांच्या भुवया उंचावल्या.

निहार ठाकरे यांनी जुलै महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु शासकीय बैठकीला त्यांनी लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हे ही वाचा : मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदेंना कधीच भेटलो नाही; ‘या’ प्रमुख नेत्याचा खुलासा

शासकीय बैठकीला निहार ठाकरे उपस्थित नव्हते. मुंबईत नवीन रुग्णालये विकसित होत आहेत आणि एका एजन्सीने त्याबद्दल सादरीकरण केले. निहार ठाकरे त्या एजन्सीशी निगडित असल्यामुळे ते प्रेझेंटेशनसाठी तिथे आले होते, असं शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

दरम्यान, निहार हे पेशाने वकील असल्याने ते एकनाथ शिंदे यांना ठाकरेंविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईत मदत करत असल्याचंही पावसकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश?”

“आत्ता छावा मैदानात, दसऱ्यानंतर आता वाघही थेट मैदानात उतरणार”

आंबेडकर चळवळीतील ‘या’ ज्येष्ठ नेत्याची उद्धव ठाकरेंना साथ; शिवसेनेत केला प्रवेश