आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात सत्ताबदल झाल्यावर अनेक नेत्यांचा भाजप व शिंदे गटात सामील होण्याचा कल वाढला आहे. अशातच आता पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित टिळक यांनी महिन्याभरापूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट घेतली होती. त्यानंतर टिळक यांनी आज राधाकृष्ण विखे पाटील यांच भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
हे ही वाचा : वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज पशू संवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर विखे पाटील यांची पत्रकार परिषद होताच,रोहित टिळक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यामुळे टिळक भाजपमध्ये प्रवेश करणार का?, अशा चर्चांनी जोर धरला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…
राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत; शिंदे गटात सामील होण्याची शक्यता
“शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”