जळगाव : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली
शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर निशाणा साधला.
हे ही वाचा : आता बाळासाहेब असते, तर त्यांनी…; अजित पवारांनी शिंदे गटाची खरडपट्टी काढली
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जवाबदारी आपल्या मुलावर म्हणजेच उद्धव ठाकरेंवर सोपवली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या राज ठाकरेंनाही बाजूला केले होते, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज बाळासाहेब असते तर बिन पाण्याने त्यांची हजामत केली असती, असा घणाघात अजित पवारांनी शिंदे गटावर केला.
महत्त्वाच्या घडामोडी –