आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
चून चून के मारेंगे, असं म्हणत शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना इशारा दिला होता. यावरून आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : “शिंदें गटाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कट्टर समर्थकानं कार्यकर्त्यांसह शिंदे गटात केला प्रवेश”
शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत. काय बापाची ठेव आहे काय? बुलढण्याचे आमदार म्हणतात शिंदे विराधात बोललात तर चुन चुन कें मारेंगे. मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा हल्लाबोल अजित पवारांनी संजय गायकवाड यांच्यावर केला.
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जबाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्या देखील बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, असा घणाघात अजित पवारांनी शिंदे गटावर केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेदांता फॉक्सकॉनचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक