Home महाराष्ट्र …म्हणून शिंदेंकडे भाजप मंत्र्यांच्या फेऱ्या वाढल्या असतील; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं...

…म्हणून शिंदेंकडे भाजप मंत्र्यांच्या फेऱ्या वाढल्या असतील; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं शिंदे गटाचं भविष्य, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. तसेच ज्या भागात शिंदे गटाचे खासदार आहेत त्या मतदारसंघातही भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अद्यापही शिंदे गटाला चिन्ह हे मिळालं नाही. जर चिन्ह हे मिळालंच नाही तर काही लोकांचा सोईस्कररित्या पराभव करता यावा, म्हणून भाजप मंत्र्यांच्या फेऱ्या वाढल्या असतील, असा टोला राजू पाटील यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच अशा परिस्थितीत त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावाच लागेल, तो ते शोधत असल्याचंही राजू पाटील यांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : वेदांता फॉक्सकॉनचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने भाजप मंत्र्यांचा दौरा सुरु आहे. पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. उद्या जर कुणाला चिन्ह मिळालं नाही, त्या जागेवर भाजपचा डोळा असणार, असा म्हणत राजू पाटलांनी शिंदे गटाला टोमणा लगावला आहे. तसेच मनसेला कुणाच्याही युतीचा प्रस्ताव आलेला नाही. सरकार नवीन असल्यानं राज ठाकरे आणि त्यांच्यात भेटीगाठी होत आहेत. याचा अर्थ युतीच असा नव्हे. तर मनसे कुणाच्या भरवश्यावर निवडणुका लढवत नाही. आमची स्वबळावरची तयारीही असल्याचं राजू पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू; शिवसेनेची शिंदे गटाला धमकी

 एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का : ‘या’ माजी आमदार-सभापतींसह 35 सरपंच शिंदे गटात सामील

शिवसेनेचा काँग्रसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश