आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. यावरून आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून केसरकरांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केसरकरांनी यावेळी लगावला.
मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही, असा खुलासाही केसरकरांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेदांता फॉक्सकॉनचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
…तर संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू; शिवसेनेची शिंदे गटाला धमकी
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का : ‘या’ माजी आमदार-सभापतींसह 35 सरपंच शिंदे गटात सामील