संजय शिरसाट म्हणाले, एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन, आता सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

0
964

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली होती. मात्र, आता त्यांना ही टीका भोवण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर मी सुषमा अंधारेंबाबत एकही अश्लील शब्द बोलला नाही, मात्र तसं सिद्ध झाल्यास मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन, असं शिरसाट म्हणाले. यावरून आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

आमदारकीचा राजीनामा देईल, सत्ता त्यागेन असं म्हणणं इतके सोप्प असतं, तर या लोकांनी सुरत, गुवाहाटी हा प्रवासच केला नसता. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा अशा लोकांच्या तोंडी अजिबात शोभत नाही. मी अबला नाही वगैरे काही नाही. परंतु, वारंवार महिलांबाबत बेताल वक्तव्य शिंदे गटाकडून होत राहतात. ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही घोटाळ्यात गुंतवता येत नसल्याने बाईपणावर हल्ले करणं जास्त सोप्पं त्यांना वाटत. मात्र, संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकणार आहे, असा इशारा सुषमा अंधारेंनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरेंच्या अडचणीत वाढ; उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, प्रकरण काय?

संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार?; सुषमा अंधारेंनी केली महिला आयोगाकडे तक्रार दाखल

आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला तुम्ही पाठिंबा दिला, मग आता का…; मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here