आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असतानाच महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची चर्चा आहे.
बल्क ड्रग पार्क प्रकल्पही सरकारने घालवला असल्याचा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : “नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”
रायगडमधील बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
दरम्यान, केंद्र सरकारबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार महाराष्ट्रातून निघून गेले आहेत. अजूनही महाराष्ट्रातील तरूण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका असा इशारा आदित्य ठाकरेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम
“शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ तारखेला कोसळणार”