महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा…अजित दादा; अजित पवारांच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

0
218

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे होर्डिंग झळकले होते. त्यांच्या होर्डिंगवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांंचे होर्डिंग झळकले आहेत.

हे ही वाचा : मोठी बातमी; निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठिंबा

या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजित दादा”, असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. अशातच, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात येत असल्यामुळे, राजकीय वर्तुळात सध्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…त्यामुळे माझाही, विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या दाव्याने खळबळ

 शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

कोल्हापूरात, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, 2019 ला बाळासाहेबांची पार्टी, शरद पवारांच्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here