Home महाराष्ट्र शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून अशातच आता एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला.

हे ही वाचा : कोल्हापूरात, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, 2019 ला बाळासाहेबांची पार्टी, शरद पवारांच्या…

दरम्यान, याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

“संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं “; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार?; कायदेतज्ञ उज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…