आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी बोदवडमध्ये संवाद रॅलीचं आयोजन केलं होतं. या संवाद यात्रेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.
गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात ते दिसतं आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तसंच पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर अमोल मिटकरी यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…
दरम्यान, अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपची महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असा गाैफ्यस्फोटही मिटकरींनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत शरद पवारांंचं मोठं विधान, म्हणाले…
शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांसोबत, भाजपच्या ‘या’ 2 आमदारांची उपस्थिती; चर्चांना उधाण