आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला राजीनामा दिला होता. अशातच आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यानं पक्षाला राजीनामा दिला आहे.
तेलंगनामधील काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार एमए खान यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर एमए खान यांनी काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा : शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंकडून खासदार नवनीत राणांचा खरपूस समाचार, म्हणाल्या, याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या…
काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्याला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येते, असं खान यांनी म्हटलं आहे. जे नेते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ज्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी आपलं उभ आयुष्य खर्ची घातलं त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यात काँग्रेसला अपयश आले. त्या दिशेने पक्षाने साधे प्रयत्न देखील केले नाहीत. याचा परिणाम आपण सर्वजण पहात आहोत. आता पक्षाचा राजीनामा दिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचं खान यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
भाजपची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”