आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
वाशीम : वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होणं पसंत केलं आहे. अशातच आता शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वाशीम मध्ये त्यांनी 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या प्रचारासाठी शहरात लावलेल्या बॅनरची चर्चा सूरू आहे.
शहरात लावलेल्या या बॅनर वर शिवसेनेचे कमी अन् भाजपच्या नेत्यांचे फोटो जास्त लावण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गट भाजपच्या वाटेवर आहे का? अशी चर्चा सुरु आहेत.
हे ही वाचा : बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर..; राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
वाशीम मध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या या मेळाव्यास भाजपचे नेते प्रवीण दरेकर, खासदार शिकांत शिंदे, आमदार शहाजी पाटील हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.
दरम्यान, वाशिमचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार निलय नाईक, माजी आमदार विजयराव जाधव भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा माजी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती राहणार आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट
खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार-काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड खलबतं; चर्चांना उधाण