MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल

0
541

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“ज्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना दलून आता औरंगजेब झालेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दगड मारण्याचं काम करत आहेत. त्यांना काश्मिरी पंडीतांपेक्षा मुस्लीम अतिरेखी जास्त जवळचे वाटतात. मला असं वाटतं की एमआयएम  भररस्त्यात त्यांची छेड काढते, त्यांच्याकडून काय अपेक्षा काय ठेवणार, ज्या पद्धतीने आदर्श बदलले, त्याप्रमाणे संगत देखील बदलली की मित्र सुध्दा बदलतात” , असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ‘…मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो’; MIMच्या ऑफरवरुन शिवसेनेची फडणवीसांवर टीका

“याची कारण अशी आहेत की, आता मज्जाचं मजा आहे. मुख्यमंत्री पद मिळालं आहे, त्यामुळे एमआयएम जवळ येवो, नाहीतर अबु आझमी जवळ येवो, नाहीतर अजून कोणी जवळ येवो आम्हाला आमच्या सत्तेशी मतबल आहे. यांना कशाशी देण घेण नाही. त्यामुळे आमची छेड जरी कोणी काढली तरी आम्ही आनंदात आहोत. राग येत नाही” असा टोलाही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं, त्यामुळे…; भाजपचा हल्लाबोल

तुमच्या निष्काळजीपणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here