आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे.
सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 29.5 फुटांवर पोहोचली आहे.याच पार्श्वभूमीवर आता एनडीआरएफची टीम या ठिकाणी येणार आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत एनडीआरएफच्या दोन टीम सांगलीत दाखल होणार आहेत.
हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; रक्षाबंधनाला असंख्य महिलांनी धरला मनसेचा झेंडा
एका टीममध्ये 22 जवान असणार आहेत. अशी 44 जणांची टीम सांगलीत दाखल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
पात्रता नसेल म्हणून…; मंत्रीमंडळ विस्तारावरुन पंकजा मुंडेंची नाराजी पुन्हा उघड
आतापर्यंत मी शांत होतो, पण…; पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी, मंत्री संजय राठोड यांचा इशारा
…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा