आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यावरून आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाऊ आदित्य ठाकरे यांनी डिवचलं आहे.
जर एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर तुम्ही हा दौरा केला असता का?,एवढाच माझा प्रश्न आहे, असा टोला अमित ठाकरेंनी यावेळी आदित्य ठाकरेंना लगावला. अमित ठाकरे सध्या नाशिक दाैऱ्यावर आहेत. यावेळी ते मनसैनिकांशी बोलत होते.
हे ही वाचा : केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, यावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान, लोक आपल्यावर विश्वास ठेवतील आणि निवडून देतील, आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि ती जिंकायची देखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो कामाल लागा, असे आदेशही अमित ठाकरेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुचं; अनेक युवक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
शिवसेनेचा भाजपाला धक्का; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद