नवी दिल्ली : मोबाईलचं उत्पादन करणाऱ्या ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय भारतामध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली आहे.
भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय ‘लावा’ इंटरनॅशनलने घेतला आहे.
उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे 600 ते 650 कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेलं आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. पण आता आम्ही ते भारतातून करणार आहोत, असं लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…
…तर चंद्रकांत पाटलांनी हातोडे, विळे, कोयते घेऊन कामाला लागावे; शिवसेनेची सामनामधूम टीका
सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्यृत्तर; म्हणाले…
…तर माझा भरोसा तुम्ही धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा