Home महत्वाच्या बातम्या …त्यामुळे काळजी नसावी; शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

…त्यामुळे काळजी नसावी; शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

205

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या  टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवारांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा??,” असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय भारतात हलवणार; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…

…तर चंद्रकांत पाटलांनी हातोडे, विळे, कोयते घेऊन कामाला लागावे; शिवसेनेची सामनामधूम टीका

सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्यृत्तर; म्हणाले…