Home महाराष्ट्र मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय...

मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांनी दिले संकेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यानंतर खोट्या कारवाईत आपल्याला अटक करायला निघाले आहेत आणि त्यासाठी अटक करुन घ्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया ईडीच्या कार्यालयाच्या आवारात संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना कमजोर नाही, महाराष्ट्र कमजोर नाही, शिवसैनिक काय असतो, आपलं उदाहरण आहे. असं म्हणत संजय राऊतांनी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना संपवण्याचा आणि संजय राऊत यांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सगळ्यांना माहित आहे असंही राऊत म्हणाले.

हे ही वाचा : संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी 9 तास झालेल्या चौकशीनंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. राऊत यांनी ईडी कार्यालयात पोहचल्यानंतर, अटकेचे संकेत दिले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“उद्धव ठाकरेंचं काम जनता कधीच विसरणार नाही, बंडखोरांना याची किंमत मोजावी लागेल”

भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले

शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान