मुंबई : करोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रेलेखातून चंद्रकांत पटलांवर निशाणा साधला आहे.
पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे, असं म्हणत शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा, असंही सामनामधूम म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्यृत्तर; म्हणाले…
…तर माझा भरोसा तुम्ही धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा- संजय राऊत
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं- हसन मुश्रीफ