आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. अशातच आता शिंदे गटानी ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : मराठी माणसाला डिवचू नका; वादग्रस्त विधानावरून, राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा
उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरेंनी आता शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे बिंदूमाधव ठाकरे पुत्र होते. परंतु बिंदूमाधव ठाकरेंचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या बिंदूमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे आहेत. निहार ठाकरेंनी शिंदे गटात सहभागी झाल्याने ठाकरे कु़टुंबीयांचा वाद चवाट्यावर आला आहे.
दरम्यान, निहार ठाकरे यापूर्वी राजकरणात सक्रिय नव्हते. मात्र शिंदे गटातून ते आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत. माजी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मराठी माणसाला डिवचू नका; वादग्रस्त विधानावरून, राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…