आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊनही एक महिना होत असला तरी, अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. अशातच राज्यात लवकरत सत्ता बदल होणार असून हे सरकार लवकर कोसळणार, असं विधान शिवसेना आणि काँग्रेसकडून होत आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बोलताना, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्यासाठीचा मुहूर्तही सांगू, असं वक्तव्य केलं. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”
मी मुहूर्तावर विश्वास ठेवणार माणूस नाही, असं अजित पवार म्हणाले. मी घेतलेली शपथ गांभीर्यपूर्वक पूर्ण करतो, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सुरुवातीला खासदार झालो होतो. आमदार झालो. राज्यमंत्री झालो होतो. चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. पण प्रत्येक वेळी मी शपथ गांभीर्यपूर्वक घेतली. घेतलेली शपथ मी पूर्णदेखील करतो. मला मुहूर्त वगैरे माहिती नाही, असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं, त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”
उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल- निलेश राणे
अकोल्यामध्ये शिवसेना फुटली; ‘या’ आमदाराचा पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश