Home महाराष्ट्र अकोल्यामध्ये शिवसेना फुटली; ‘या’ आमदाराचा पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

अकोल्यामध्ये शिवसेना फुटली; ‘या’ आमदाराचा पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अशातच आज शिंदे गटाने अकोला जिल्हा शिवसेनेत फूट पाडली आहे.

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे आमदार पुत्र विप्लव बाजोरिया व माजी नगरसेवकांसह 26 जणांनी आज मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बाजोरिया यांच्यासोबत शिंदे गटात कोण सामील होणार याची चर्चा जिल्ह्यात रंगली होती.

हे ही वाचा : दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या

दोन दिवसांपूर्वी बाजोरिया पिता-पुत्रांसह एकूण 26 जण मुंबईत पोहचले होते. त्यानंतर आज सायंकाळी या सर्वांनी मुंबईत सह्यांद्री अतिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बाजोरिया यांची लगेच अकोला जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ महिला खासदाराच्या घटस्फोटित पतीने हाती बांधलं शिवबंधन

“मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची बहीण उद्धव ठाकरेंसोबत; दिले ‘हे’ मोठे संकेत”