आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यानं पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला.
काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी पक्षाला राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. अरूण सावंत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
आपणा सर्वांचे आभार….@NANA_PATOLE @INCMaharashtra @INCMumbai @INCIndia @RahulGandhi pic.twitter.com/NeQeGkrn29
— Arun Vasant Sawant – अरुण वसंत सावंत (@ArunSawant_says) July 25, 2022
हे ही वाचा : “कोल्हापूरातील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?; खासदार धैर्यशील मानेंची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. 40 आमदारांंनी बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”
शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा आरोप