आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
2014 आणि 2017 मध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे विश्वास ठेवण्यासारखे नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते मात्र, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली. राज ठाकरेंनी आज झी 24 तास या मराठी वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : “सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळतात आहे, अशा परिस्थितीत जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का? यावर राज ठाकरे म्हणाले, शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचाराने बांधली गेलेली माणसे होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता. त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसे होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हते, असं राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट