Home महाराष्ट्र “द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”

“द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सोमवारी पार पडलेल्या देशाच्या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.

हे ही वाचा : उद्धव साहेब, मी तुमच्यासोबत; बीडच्या कट्टर शिवसैनिकानं रक्तानं लिहिलं पत्र

दरम्यान, राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तब्बल 16 आमदार फुटल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?, यशवंत सिन्हा की द्राैपदी मुर्मू”

एकनाथ शिंदेंचा मला देखील फोन आला होता, पण मी….; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…