आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सोमवारी पार पडलेल्या देशाच्या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदी विराजमान होणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सोमवारी झालेल्या निवडणुकीत 99 टक्के लोकप्रतिनिधींनी मतदान केलं होतं. देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडलं.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मला देखील फोन आला होता, पण मी….; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट
दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी 771 खासदार आणि 4025 आमदारांसह 4796 मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ नेत्याची घरवापसी