आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनीदेखील बंडखोरी केली आहे.
अशातच शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपलीच असल्याचं म्हणत हालचाली चालू ठेवल्या आहेत. पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात आहेत. तर शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची?, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : सह्याद्री वाहिनीवर मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत; राज ठाकरेंचा इशारा
शिवसेना कुणाची हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातूनच स्पष्ट होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर बोलताना जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितलं आहे. पण त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. शिंदे गटाला पार्टीत पूर्ण फूट पडल्याचं दाखवावं लागेल. तोच मुद्दा कोर्टाच्या निरीक्षणात पुढे येईल. सर्व गोष्टी या कोर्टाकडूनच स्पष्ट होतील. शिवसेना नक्की कोणाची हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातून निकाली निघू शकेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी मनसे नेते अमित ठाकरे पंगतीत बसून जेवले; व्हिडिओ व्हायरल
शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी, चाैघांना अटक
कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा