मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत.
शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
दरम्यान, या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.
महत्वाच्या घडामोडी-
…तर कोल्हापूरमधून का निवडणूक लढवली नाही; एकनाथ खडसेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल
“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सवाल