Home पुणे शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशातच शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

जेंव्हा जेंव्हा शिवसेना फुटली तेंव्हा तेंव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार?; आमदार राजू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दीपक केसरकर यांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केलं होतं. ते आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

दीपक केसरकर 1992 मध्ये फार ज्युनियर होते. त्यावेळी ते आमच्याच पक्षात होते. आता केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्यं करताना फार विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक केली पाहिजेत. प्रवक्ते म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये. बारकाईने माहिती घ्यावी., असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात

मोठी बातमी! दिपाली सय्यद यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडेंचा समावेश होणार का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…