आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे, असे दोन गट पडले होते. यानंतर अनेकांनी शिवसेना आणि शिंदे गटाने परत एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही शिवसेना आणि शिंदे एकत्र यावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकऩाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेनी परत उद्धव ठाकरेसोबत यावं, अशी विनंती केली आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे.
हे ही वाचा : नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडेंचा समावेश होणार का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही. तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का?, मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
राणेंची मुलं लहान, त्यांना समज देण्याचं काम फडणवीस करतील- दीपक केसरकर
धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…