शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

0
301

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

माणसाची हाव किती असते. इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिलं. आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झाला. तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “दसरा मेळाव्याच्या आधीच राडा; नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप”

दरम्यान, एक तर स्वतच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वतच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. काय दिवटं कारटं माझ्या पोटी जन्माला आलं. माझ्या ऐवजी दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव लावतं. स्वताचे विचार नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

धनुष्यबाण कुणाचं?; कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता

अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच; रामदास आठवलेंकडून ऑफर

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून आमंत्रण आल्यास दसरा मेळाव्याला येणार; आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here