आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आशातच शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात साळी सहभागी झाले असून प्रथमच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अधिकृत राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा : मनसेला मंत्रीमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रीमंडळात स्थान हवं- रामदास आठवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असताना शिवसेनेजे माजी शहर प्रमुख अजय भोसले, युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह त्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी हे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झाले होते. या भेटीनंतर किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
गिरीश महाजन हे बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊन ते मत मागत होते; एकनाथ खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर
आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त
40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा